टेम्पो व कॉलेज बस ची समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार तर 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे.
या अपघातातील जखमी झालेले अनेक विद्यार्थी चिंताजनक असून ते अकरावी आणि बारावीच्या शकत होते. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे हा अपघात घडला आहे.
घटनास्थळावरून मिळालेला अधिक माहितीनुसार अथणी पासून मिरज रोडवर तीन किलोमीटर अंतरावर बनजवाड येथे हायस्कूल आणि कॉलेज आहे शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांना अथणी येथून घेऊन बस कॉलेज कडे निघाली होती त्याचवेळी मिरज कडून अथणीकडे प्लास्टिक पाईप भरलेला आयशर टेम्पो येत होता अथणी शहरालगतच टेम्पो आणि कॉलेज बस मध्ये आमोरासमोर धडकून हा अपघात घडला आहे.
या भीषण अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या एका शिक्षकांचा हात आणि पाय तुटला आहे तर बस चालकाच्या बाजूला बसून प्रवास करणारे काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. आमदार श्रीमंत पाटील यांनी घटनास्थळी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका पाठवून तातडीने जखमी विद्यार्थ्यांना इस्पितळात पोचवण्याचे काम केले आहे.
घटनास्थळी पोलीस ही दाखल झाले असून हा अपघात कसा झाला याची अपघाताची चौकशी केली जात आहे