Tuesday, April 30, 2024

/

शनिवारी यासाठी बंद असणार बेळगावची बाजारपेठ

 belgaum

सरकारने अन्न धान्यावर 5 टक्के जी एस टी कर लागू केल्याच्या निषेधार्थ रविवारपेठ आणि मार्केट मधील व्यापाऱ्यांनी शनिवारी 16 जुलै रोजी बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी बसवेश्वर बँकेच्या सभागृहात विविध व्यापारी संघटनांची बैठक झाली या बैठकीत बंदचा निर्णय घेतला आहे. अन्न धान्यावर 5% जी एस टी लागू केल्याने आता खाद्य पदार्थ महागणार आहेतच याशिवाय महागाई वाढणार आहे.

केंद्र सरकारचा हा निर्णय चुकीचा त्यामुळे महागाई वाढणार आहे तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी बेळगावातील बाजारपेठ बंद करणार असल्याचे या व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.