Monday, May 6, 2024

/

यांनी घातले श्री जोतिबाला साकडे…

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी शनिवार दि. 23 जुलै 2022 रोजी ज्योतिबा मंदिर कोल्हापूर येथे भेट देऊन सीमा प्रश्नासाठी साकडे घातले.
बेळगाव शहर चे जोतिबा डोंगरावरील पुजारी भगवान सांगळे यांना ह्या आठवड्याचा आरती व पूजा करण्याचा मान होता.

पुजाऱ्यांचा या मानाच्या आठवड्यात आशीर्वाद घ्यायच्या उद्देशाने नगरसेवक आपल्या मित्र परिवाराबरोबर ज्योतिबा डोंगर ला भेट दिली. तिथे पुजाऱ्यांना आहेर श्रीफळ देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. व सीमाप्रश्ननी कोर्टातला निर्णय लवकरात लवकर लागावा आणि मराठी माणसाला न्याय मिळावा.यांच्यावर होणारा अन्याय कमी करावा व कोरोनाची महामारी लवकरात लवकर पूर्णपणे संपावी अशी मागणी करत देवाला साकडे घातले. Jyotiba temple

या भेटी प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती च्या वतीने दीपक मेहतर ज्योतिबा डोंगर अधिकारी यांच्या हस्ते नगरसेवकांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 belgaum

त्यांच्यासोबत बेळगावातील प्राचार्य आनंद आपटेकर,नितीन रजगोळकर,दशरथ नांगरे ,अमेय कदम ,आप्पाजी बसवाडकर,अवधूत पुणेकर, सुमन जाधव, आनंद टपाले ,
जयदीप भोसले ,महेश चतुर आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.