Friday, April 26, 2024

/

पोपटाची विक्री करणारा वनखात्याच्या ताब्यात

 belgaum

बंदी असलेल्या पोपटांची विक्री करणाऱ्या पाटील मळा येथील एका युवकाला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

वन खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश गुरव (रा. तांगडी गल्ली, बेळगाव) असे वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नांव आहे. सदर युवका सोबत चार पोपट आणि एक पिंजरा देखील जप्त करण्यात आला आहे.

पाटील मळा परिसरामध्ये बंदी असलेल्या पोपटांची विक्री करणाऱ्या आकाश याला रंगेहात पकडून देण्यात एक्वेरियम चालकाचे सहकार्य लाभले.Parrot

 belgaum

आकाश गुरव हा पाटील मळा परिसरात बंदी असलेल्या पोपटांची विक्री करत असल्याची माहिती संबंधित एक्वेरियम चालकाकडून मिळताच वन अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी दाखल होऊन आकाशला रंगेहात पकडले.

या प्रकरणी बेळगाव वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर पोपट विक्रेत्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. भारतीय मूळ पोपटांची विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.