Friday, March 29, 2024

/

…अन् पालकांनी निभावली रहदारी पोलिसाची भूमिका

 belgaum

अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे कॅम्प येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल आणि सेंट पॉल हायस्कूल मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने पालकांनाच रहदारी पोलिसांच्या भूमिकेत शिरून वाहतूक सुरळीत करावी लागल्याची घटना नुकतीच घडली.

अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे कॅम्प येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल आणि सेंट पॉल हायस्कूल मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्यामुळे येथील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वर बंदी घालण्यात यावी, अशी जोरदार मागणी सध्या पालकवर्गाकडून केली जात आहे.

ग्लोब टॉकीजकडून सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल आणि सेंट मेरी हायस्कूल मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी पालक व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. या मार्गावरून अवजड वाहनांची ये -जा देखील सुरू असते. अवजड वाहनांबरोबरच हिंडलगा, उचगाव, शिनोळी व पुढे महाराष्ट्रात जाणारी वाहने शॉर्टकट पडत असल्याने ग्लोब टॉकीजकडून जाणाऱ्या या मार्गाचा अवलंब करत असतात. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या सकाळच्या आणि शाळा सुटण्याच्या सायंकाळच्या सत्रात या मार्गावर पालक, विद्यार्थी आणि वाहने यांची एकत्रित एकच गर्दी होत असते. अरुंद असलेल्या या रस्त्यावर एखादे अवजड वाहन येऊन अडकल्यास वाहतूक कोंडीचा प्रकार घडतो.

 belgaum

असाच प्रकार काल शुक्रवारी सकाळी देखील घडला. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर त्याठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्यासह कांही पालकांना रहदारी पोलीसाच्या भूमिकेत शिरून वाहतुकीची कोंडी फोडावी लागली.Camp police

अवजड वाहनांसाठी शहरात वेळेची मर्यादा असतानादेखील सध्या पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातून अवजड वाहतूक सुरू आहे. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कॅम्प येथील ग्लोब टॉकीजकडून जाणाऱ्या रस्त्यावर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असून अवजड वाहनांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे एखादा अनर्थ घडण्यापूर्वी सदर रस्त्यावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालावी. त्याचप्रमाणे सेंट जोसेफ व सेंट पॉल हायस्कूल या शाळांच्या ठिकाणी या मार्गावर सकाळी 8:30 ते 9 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते 3:30 वाजेपर्यंत रहदारी पोलिसांची नेमणूक केली जावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.