बेळगाव लाईव्ह : बेळगाव मधील ओल्ड पी. बी रोडवरील श्री रेणुका देवी माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही काकणभरणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला. या पारंपरिक सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
या सोहळ्यादरम्यान देवीची ओटी भरून परड्या भरण्याचा विधी पारंपरिक पद्धतीने पार पडला. आज दुपारी अक्षतारोपण पार पडल्यानंतर मुख्य देवकार्याला सुरुवात झाली. या मंगलप्रसंगी बेळगावच्या महापौरांनी मंदिरात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.
यावर्षी मान्सूनचा पाऊस लांबल्याने बेळगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर, आगामी काळात उत्तम पीकपाणी व्हावे आणि सर्व संकटे दूर व्हावीत, यासाठी देवस्थान समिती आणि भाविकांच्या वतीने देवीला विशेष साकडे घालण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही काकणभरणी उत्सव अत्यंत आनंदात साजरा झाला असून दुपारच्या मुहूर्तावर सर्व विधी शांततेत पार पड्ले. बेळगाव परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने, शेती समोरील अडचण दूर होऊन उत्तम पीकपाणी यावे आणि सर्व बेळगावकरांची चिंता मिटावी, यासाठी देवीकडे सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले असल्याची माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली.
यावेळी सामूहिक आरती पार पडली. या सर्व सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती.




