belgaum

येळ्ळूरमध्ये म.ए. समितीकडून मशाल मिरवणूक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्तीच्या धोरणाविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार, २२ जून रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याच्या जनजागृतीसाठी येळ्ळूर म.ए. समितीच्या नेतृत्वाखाली रात्री शेकडो कार्यकर्त्यांनी मशाल मिरवणूक काढली.

मिरवणुकीच्या सुरुवातीला सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी, कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर असंविधानिक अत्याचार करत असल्याचा आरोप केला. कायद्यानुसार कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेलाही घटनात्मक हक्क मिळावेत, अन्यथा मराठी भाषिक कधीही स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

या वेळी येळ्ळूर म.ए. समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष वामन पाटील, नेते रमाकांत कोंडुस्कर, रणजित चव्हाण, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, दौलत कुगजी आदी मान्यवरांच्या हस्ते मशाली प्रज्वलित करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. ही मशाल मिरवणूक शिवसेना चौकातून निघून प्रमुख मार्गावरून फिरत महाराष्ट्र चौकात विसर्जित झाली.

 belgaum

मिरवणुकीदरम्यान ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘मराठी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या आंदोलनात कार्याध्यक्ष दुधप्पा बागेवाडी, ॲड. अमर येळ्ळूरकर, राजू पावले, दत्ता उघाडे यांच्यासह म.ए. समितीचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मशाल मिरवणूकीची सुरुवात येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष वामन पाटील, समितीचे नेते रमाकांत दादा कोडूसकर, रणजित चव्हाण, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, दौलत कुगजी आदि मान्यवरांच्या हस्ते मशाली पेटवून करण्यात आली
यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकिसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, मराठी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची आशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

मशाल मिरवणूक शिवसेना चौकातून प्रमुख मार्गावरून फिरुन महाराष्ट्र चौकात विसर्जित करण्यात आली.
कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर, राजू पावले, दत्ता उघाडे, नागेंद्र पाखरे, महेश जुवेकर, शेखर पाटील, सुहास हुद्दार, उमेश पाटील, राजू मरवे, प्रा. आनंद आपटेकर, सुनील बाळकुंद्री, सागर पाटील, चांगदेव परीट, नागेश बोबाटे, शिवाजी सायनेकर, दयानंद उघाडे, सुरज गोरल, गणेश अष्टेकर, सतीश शि. पाटील, श्रीकांत नांदुरकर, प्रकाश पाटील, प्रकाश मालुचे, अनिल हुंदरे, नेताजी गोरल, शिवाजी कदम, यल्लुप्पा पाटील, सतीश देसूरकर, रमेश पाटील, शुभम जाधव, अनिल पाटील, नंदकुमार पाटील, कृष्णा शहापूरकर, राकेश परीट, दौलत पाटील, कृष्णा बिजगरकर, रमेश धामणेकर, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.