belgaum

हायवेवर अफीमचा सौदा फसला!लाखोंचा मुद्देमाल जप्त

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील केंद्रीय गुन्हे शाखेच्या म्हणजेच सीसीबी पोलिसांनी अमली पदार्थांच्या छुप्या विक्रीविरोधात मोठी कारवाई केली आहे. शहरात लाखो रुपये किमतीच्या अफीमची विक्री करण्यासाठी आलेल्या राजस्थानमधील एका तस्कराला पोलिसांनी रंगेहात अटक केली.

बेळगाव येथील हिंडलको फॅक्टरी जवळील राष्ट्रीय महामार्ग ४८ च्या सर्विस रस्त्यावर अमली पदार्थांची खरेदी-विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती सीसीबी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून धाड टाकली.

या कारवाईत राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील रहिवासी असलेला २९ वर्षीय शुभम मदनलाल शर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा संशयित स्वतःच्या फायद्यासाठी राजस्थानमधून अफीम आणून बेंगळुरू येथील रहिवासी खैताराम चौधरी नावाच्या व्यक्तीला विकण्याच्या तयारीत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

 belgaum

या यशस्वी कारवाई दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीकडून सुमारे ५ लाख रुपये किमतीचे १.०४८ किलो वजनाचे काळ्या रंगाचे द्रव स्वरूपातील अफीम जप्त केले आहे. याशिवाय आरोपीकडून ५० हजार रुपये किमतीचा आयफोन १४ प्लस मोबाईल फोन देखील हस्तगत करण्यात आला असून एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध बेळगाव येथील माळमारुती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या या पोलीस पथकाचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी विशेष कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.