28 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Monthly Archives: June, 2022

इमारतीला गळफास घेऊन वॉचमनची आत्महत्या

एका वॉचमनने तीन मजली इमारतीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साई कॉलनी मेनरोड शाहूनगर येथे आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नांव शिवाजी जगताप अप्पा बिर्जे (वय 65) असे असून तो जेएनएमसी येथे वाचमेनचे काम करत होता. सदर...

चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुरस्कारांचे होणार वितरण

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, व्ही टी यू चे रजिस्टर डॉ आनंद देशपांडे आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजीअध्यक्ष पंचाक्षरी चोन्नद यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे...

क्षुल्लक कारणावरून मच्छीमाराला मारहाण

क्षुल्लक कारणावरून एका मच्छीमार तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बेळगाव तालुक्यातील नावगे गावामध्ये घडली आहे. शंकर पाटील (रा. हुंच्यानटटी) असे मारहाण झालेल्या मच्छीमार तरुणाचे नाव आहे. नावगे गावच्या तळ्यात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या शंकर याला गावातीलच कांही तरुणांनी हल्ला करून...

गुंडांवर निरंतर टाकणार धाडी -उपायुक्त गडादी

खबरदारीची उपाययोजना म्हणून आज भल्या पहाटे शहरातील 26 गुंडांच्या घरांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. अजूनही कांही गुंड आहेत ज्यांची यादी तयार केली जात असून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. धाडी टाकण्याची ही मोहीम निरंतर प्रक्रिया असणार असून यापुढेही गुंड...

सिद्धरामय्या सौन्दत्तीतून लढण्याची शक्यता

म्हैसूरच्या चामुंडी मतदार संघातील बदामीच्या श्री बनशंकरी देवीच्या कृपाशीर्वादाखाली आश्रय घेणारे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आता बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवीच्या आश्रयाला येण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. सौंदत्ती यल्लमा मतदारसंघातून सतीश जारकीहोळी हे आगामी निवडणूक लढविण्याचा विचार...

सिंगल यूज प्लास्टिकवर 1 जुलैपासून बंदी!

केंद्र सरकारने येत्या 1 जुलैपासून देशात एकेरी वापराच्या म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. पर्यावरण मंत्रालयाने यासंदर्भात काल मंगळवारी अधिसूचना जारी केली आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार 1 जुलै 2022 पासून एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन,...

‘समितीचे निवेदन केराच्या टोपलीत टाका’-कन्नड संघटनेची कुल्हेकुई

महाराष्ट्र एकीकरण समितीने अल्पसंख्यांक संख्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांची झडपशाही झुगारून पुन्हा एकदा रस्त्यावर मराठी आवाज दाखवला आणि मराठी परिपत्रकाची मागणी केली यामुळे पोटशूळ उठलेल्या कन्नड संघटनांनी बेताल वक्तव्य करायला सुरुवात केलेली आहे कन्नड रक्षण वेदिकेचा जिल्हा अध्यक्ष...

जुलैपासून होणार विजेच्या दरात वाढ

येत्या जुलै ते डिसेंबर अशा 6 महिन्यांसाठी ग्राहकांकडून इंधन खर्च समायोजन शुल्क आकारणीद्वारे वीज दरांमध्ये सुधारणा करण्यात यावी या मागणीचा वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी (हेस्कॉम) सादर केलेला प्रस्ताव कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केईआरसी) मंजूर केला आहे. केईआरसीच्या मंजुरीमुळे काढण्यात आलेल्या...

शैक्षणिक गुणवत्ता सुधारणेत बेळगाव जिल्हा देशात ‘अतिउत्तम’

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2018 -19 आणि 2019 -20 या कालावधीतील देशभरातील जिल्ह्यांच्या शिक्षणातील कामगिरीच्या निर्देशांकांची वर्गवारी (पीजीआय -डी) जाहीर केली आहे. सर्व समावेशक विश्लेषणाद्वारे निर्देशांक तयार करून जिल्हास्तरावर शालेय शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता सुधारणा कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. या अहवालात...

बेळगाव ते सुळधाळ रेल्वेमार्गाचे स्पीड ट्रायल यशस्वी

दुपदरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या बेळगाव ते सुळधाळ दरम्यानच्या रेल्वेमार्गावर स्पीड ट्रायलद्वारे ताशी 120 कि. मी. वेगाने करण्यात आलेली पाहणी यशस्वी झाली असून लवकरच हा रेल्वे मार्ग सेवेत दाखल होणार आहे. मिरज ते लोंढा यादरम्यान केल्या जात असलेल्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण्याचे...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !