Thursday, December 5, 2024

/

हिंदुत्ववादी संघटनांचे चन्नम्मा चौकात तीव्र आंदोलन

 belgaum

सोशल मीडियावर नुपुर शर्मा यांचे समर्थन केल्याबद्दल राजस्थानातील उदयपूर येथे हिंदू टेलर कन्हैयालाल याची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील हिंदुत्ववादी संघटनांनी आज गुरुवारी सकाळी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे रास्तारोको करून तीव्र आंदोलन छेडले.

मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या पूर्वाश्रमीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केलेल्या उदयपूर येथील हिंदू टेलर कन्हैयालाल याची धर्मांधाने नुकतीच तलवारीने तळा चिरून निर्घृण हत्या केली. या घटनेचे संतप्त पडसाद देशभर उमटत आहेत.

बेळगावमध्ये देखील आज गुरुवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी राणी चन्नम्मा सर्कल येथे तीव्र आंदोलन छेडले. यावेळी जय श्रीराम, भारत माता की जय अशा जोरदार घोषणा देत मानवी साखळी करून रास्तारोको करण्यात आला. त्याचप्रमाणे धर्मांधांच्या प्रतिकृतीचे दहन करून हिंदू कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्याचप्रमाणे कन्हैयालाल यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात येत होती.

यावेळी आंदोलनकर्यांना संबोधित करताना विश्व हिंदू परिषदेचे नेते कृष्णा भट म्हणाले, देशात खरे बोलणाऱ्यांच्या हत्या करण्याचा डाव धर्मांध शक्तीने आखल्याचे कन्हैयालाल यांच्या हत्येवरून स्पष्ट होते. पैगंबर आणि मुस्लिम धर्माच्या विरोधात बोलणाऱ्यांचे मुडदे पाडू म्हटल्यावर कोणीही हे सहन करणार नाही. घटनात्मक पद्धतीने निषेध नोंदविण्यास कायद्याने परवानगी आहे. कर्नाटकात धर्मांधांनी 24 निष्पाप हिंदूंची हत्या केली आहे. गेल्या 70 वर्षात काँग्रेसने मुस्लिमांचे तुष्टीकरण केल्याचे दुष्परिणाम आज आम्ही भोगत आहोत असे भट यांनी सांगितले.Bjp strike

बेळगावच्या खासदार मंगल अंगडी, बेळगाव ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील भाजप नेते किरण जाधव, जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत, उज्वला बडवानाचे, भाजप ग्रामीण मंडल अध्यक्ष धनंजय जाधव, श्रीराम सेनेचे नेते रवी कोकितकर यांच्यासह विविध हिंदू संघटनांचे नेते आणि बहुसंख्य कार्यकर्ते आजच्या या आंदोलना सहभागी झाले होते.

हिंदुत्ववादी संघटनांच्या आजच्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीसीपी रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली राणी चन्नम्मा सर्कल येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी 200 हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन केल्याने चन्नम्मा सर्कल येथे कांही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.