Sunday, July 14, 2024

/

झाडाला गळफास लावून इसमाची आत्महत्या

 belgaum

उचगाव (ता. जि. बेळगाव) येथे एका इसमाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी उघडकीस आली असून यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

श्रीकांत जाधव (वय 56) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नांव असून भावानी केलेल्या छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मयत श्रीकांत याच्या मुलाने केला आहे. आपल्या वडिलांना त्यांचे भाऊ खूप त्रास देऊन छळ करत होते. त्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे संतोष श्रीकांत जाधव याने सांगितले.

गेल्या चार वर्षांपूर्वी सर्व्ह क्र. 647 येथील आमची जमीन सुधीर गड्डे या बिल्डरने 28 लाखाला विकत घेतली होती. या व्यवहारात मधुकर अप्पाजी जाधव यांनी माझे वडील आणि आजोबांना फसविले होते.

यासंदर्भात बिल्डर सुधीर गड्डे यांच्याविरुद्ध केसही केली होती. मात्र पंचांना बोलावून समझोता करण्याद्वारे प्रकरण मिटवण्यात आले होते. त्यानंतर सब रजिस्ट्रारमध्ये नकली कागदपत्रं तयार करून घेतले होते आणि 6 लाखांचा चेक दिला होता आणि सर्व्ह क्र. 547 मधील 1 एकर 6 गुंठे जमीनही घेतली आहे.

अभिजीत मधुकर जाधव, शशिकांत मधुकर जाधव व ग्रामपंचायत सदस्य भारता मधुकर जाधव यांनी पंचांनाही अडवले होते. खोटी तक्रार देऊन माझ्या वडिलांचा छळ चालवला होता, असेही संतोषने स्पष्ट केले. आत्महत्ये प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.