एका वॉचमनने तीन मजली इमारतीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साई कॉलनी मेनरोड शाहूनगर येथे आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.
आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नांव शिवाजी जगताप अप्पा बिर्जे (वय 65) असे असून तो जेएनएमसी येथे वाचमेनचे काम करत होता.
सदर प्रकाराची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला धाडला आहे.
शिवाजी बिर्जे याच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.