Friday, March 29, 2024

/

गौंडवाड खून प्रकरणातील आरोपींना फाशी द्या

 belgaum

गौंडवाड खून प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करत त्यांना फाशी द्यावी अशी मागणी करत कुटुंबीयासह शेकडो ग्रामस्थांनी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.यावेळी खून झालेल्या सतीश पाटील च्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आक्रोश केला व आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

या खून प्रकरणातील मुख्य आरोपी अजून मोकाट फिरत आहेत त्यांना तात्काळ अटक करावी एकूण 25 जणांनी फोन केल्या चा आम्ही आरोप केला आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ज्या ज्या देवस्की जमिनीबाबत सतीश पाटील आंदोलन करत होते त्या दिवस की जमिनीवर स्थगिती मिळावी अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणी ज्या निर्दोष व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे त्या निर्दोष लोकांची तात्काळ मुक्तता करण्यात यावी पोलिसांनी या प्रकरणी गंभीरपणे लक्ष दिले असते तर अशी घटना टाळता आली असती त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या वेळी करण्यात आली

दरम्यान बेळगाव शहरापासून अवघ्या 9 कि. मी. अंतरावर असलेल्या गौंडवाड (ता. जि बेळगाव) येथे मंदिराच्या जमीन वादातून गेल्या शनिवारी रात्री एकाचा खून होण्याबरोबरच दंगल घुसळून दगडफेक व जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर निर्माण झालेला तणाव निवळून आता गावातील वातावरण पुन्हा पूर्वपदावर येऊ लागले आहे.Goundwad protest

 belgaum

गौंडवाड येथील मंदिराच्या जमिनीचा वाद गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. दोन गटातील या वादातून गेल्या शनिवारी रात्री 9 च्या सुमारास गावातील काळभैरवनाथ मंदिरासमोर सतीश राजेंद्र पाटील या युवकाचा खून झाला. खुनाच्या या घटनेनंतर गावात दंगल उसळून संतप्त जमावाने जवळपास 11 हून अधिक वाहने पेटवून देण्याबरोबरच गवत गंजीनाही आगी लावल्या.

त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नागरि पोलिसांबरोबरच कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडीही गावात तैनात करण्यात आली. याखेरीज एक सहाय्यक पोलीस आयुक्त, दोन पोलीस निरीक्षक आणि कांही पोलीस उपनिरीक्षक अद्यापही गौंडवाड गावात तळ ठोकून आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.