Thursday, March 28, 2024

/

निवडणूक कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 belgaum

आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी नेमणूक झालेल्या कर्मचार्‍यांसाठी आयोजित प्रशिक्षणाचा कार्यक्रम आज शुक्रवारी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात पार पडला.

राज्य विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आज शुक्रवारी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना निवडणूक प्रशिक्षण अधिकारी एन. व्ही. शिरगावकर म्हणाले, कोणत्याही निवडणुकीत कर्मचाऱ्यांचे काम अत्यंत महत्त्वाचे असते. ऐरवी सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चुका झाल्यास त्यांना माफी दिली जाते. मात्र निवडणुकीचे काम करताना झालेली चूक तुमच्या कर्तव्यात मोठी अडचण ठरू शकते.

 belgaum

निवडणुकीचे कोणतेही काम असो ते सक्रियपणे कर्तव्यदक्षतेने केले पाहिजे. आता आगामी एमएलसी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार कोणत्याही त्रुटी न ठेवता काम करावे.

ही निवडणूक एकाच खोलीत एकाच मतपेटीत बॅलेट पेपर मद्वारे होणार आहे असे सांगून येणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार संधी देण्यात यावी असे शिरगावकर यांनी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, आफ्रीन बानू बळ्ळारी, मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी आदी वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.