Friday, March 29, 2024

/

एका दिवसात बसपास देण्याची जय्यत तयारी

 belgaum

शालेय विद्यार्थ्यांना वेळेत बसपास उपलब्ध करून देण्यासाठी कंबर कसलेल्या वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाकडून अर्ज प्राप्त झालेल्या एका दिवसातच विद्यार्थ्यांना पास मिळणार आहे. या दृष्टिकोनातून परिवहन मंडळाने जय्यत तयारी केली आहे.

बस पाससाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 मेपासून सुरू होणार होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे काल गुरुवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे जुने पास 30 जूनपर्यंत जाणार आहेत.

त्याआधीच सर्व विद्यार्थ्यांना नवीन बसपास उपलब्ध करून देण्याचा परिवहन मंडळाचा मानस आहे. त्यानुसार अर्ज केलेल्या केवळ एका दिवसात विद्यार्थ्यांना बस पास उपलब्ध होणार आहेत. बसपाच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून जुनेच दर कायम ठेवण्यात आले आहेत. बस पास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपल्या नजीकच्या सामान्य सेवा केंद्रावर (सीएससी) जाऊन ‘सेवा सिंधू’ या संकेतस्थळावर बसपासचा ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे.

 belgaum

शालेय विद्यार्थ्यांना बस पास वितरणाची जय्यत तयारी करताना परिवहन मंडळाने पास काउंटरवर 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून याठिकाणी शाळेकडून येणारे एकत्रित अर्ज आणि शुल्क स्वीकारले जाणार आहे. बसपास वितरणासाठी पाच संगणकांवर 5 ऑपरेटर्स नियुक्त करण्यात आले आहेत. छापील बसपासवर विद्यार्थ्यांचे नांव, ठिकाण, बस प्रवासाचा मार्ग आदी माहिती लिहिण्यासाठी 20 कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. या व्यतिरिक्त ऑनलाइनद्वारे दाखल अर्जांच्या पडताळणीसाठी 6 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून तयार बसपाचे प्लास्टिक लॅमिनेशन करण्यासाठी 3 मशीन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

बसपास वितरणाचे काम दिवसभरात दोन शिफ्टमध्ये होईल सकाळी आणि सायंकाळी सर्व्हर डाऊनची समस्या भेडसावणार नसल्याने सकाळी 6 वाजता पहिले शिफ्ट सुरू होणार आहे, तर दुसरी शिफ्ट रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे.

बसपास तयार होताच संबंधित शाळेला दूरध्वनीवरून माहिती दिली जाणार आहे. एकंदर अर्ज प्राप्त झालेल्या एका दिवसातच विद्यार्थ्यांसाठी बसपास तयार केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.