Thursday, April 25, 2024

/

शरद पवारांनी दिली सीमा भागातील विद्यार्थ्यांना गोड भेट

 belgaum

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सीमा भागातील मेडिकल विद्यार्थ्यांकरिता असलेला सात जागांचा एम के बि चा कोटा 15 असा वाढवून देऊ असे आश्वासन दिले.

बुधवारी सकाळी माजी महापौर सरिता पाटील यांनी हिंदवाडी येथे बेळगाव दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांची भेट घेतली त्यांनी बेळगावसह सीमा भागसाठी मेडिकल कॉलेज आणि इंजिनियर साठी असलेला राखीव कोटा वाढवून द्यावा अशी विनंती केली त्यावर शरद पवार यांनी तात्काळ या मागणीची दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून तात्काळ एम के बी चा कोटा 7 वरून 15 असा वाढवा अशा सूचना केल्या.

त्यावर महाराष्ट्राच्या दोन्ही मंत्री महोदयांनी आपण लवकरच हा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळापुढे ठेवणार असून पुढील वर्षीपासून बेळगावसह सीमा भागातील मेडिकल विद्यार्थ्यांना पंधरा जागांचा कोटा वाढवून देण्याचे आश्वासन दिले.दोन वर्षापासून माजी महापौर सरिता पाटील या शरद पवार आणि महाराष्ट्र शासनाला यासाठी वारंवार निवेदने देत पाठपुरावा करत आहेत अखेर या पाठपुराव्याला  यश मिळताना दिसत आहे.Pawar sarita

 belgaum

1990 च्या दशकापासून सीमाभागातील मेडिकल विद्यार्थ्यांसाठी सात जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या त्या गेल्या तीस वर्षांमध्ये जागा तेवढ्याच आहेत आजच्या परिस्थितीमध्ये नीट च्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे आणि हा कोटा बेळगावसह बिदर भालकी या भागातील विद्यार्थ्यांना देखील लागू आहे त्यामूळे महाराष्ट्रात मेडिकल कॉलेजला अडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांत स्पर्धा होत आहे त्यामुळे हा कोटा वाढवावा अशी मागणी सरिता पाटील यांनी शासनाकडे केली होती अखेर बेळगाव दौऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवार यांनी या मागणीवर आश्वासन देत जागा वाढवून 15 करण्याचे आश्वासन देत दोन्ही मंत्र्यांना आदेश दिले आहेत.

सरिता पाटील यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचा कोटा वाढवून मिळालेल्या ठोस आश्वासनामुळे सीमाभागातील मराठी माणसाला शरद पवार यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने एक गोड भेट मिळालीच आहे असेच म्हणावे लागेल.बुधवारी सकाळी सरिता पाटील यांना शरद पवार यांनी आश्वासन दिलं याबाबतीत ज्योती कॉलेज येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सांगता कार्यक्रमात सहभाग घेताना पवारांनी या गोष्टीला दुजोरा देत मेडिकलच्या सिट वाढवून देण्याचे बोलून दाखवले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.