belgaum

चिकोडीत महाराष्ट्र एकीकरण समितीची बाजी!

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बलाढ्य महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव संघाने अंतिम सामन्यात इचलकरंजी क्रिकेट क्लबचा पराभव करत चिकोडी येथे आयोजित डे अँड नाईट भव्य हाफपीच क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. विजेत्या संघाने आकर्षक करंडकासह रोख 51,555 रुपयांचे पारितोषिकही मिळवले.


कुमार गजानन मंडळ, गुरुवार पेठ, चिकोडी यांच्या वतीने बी.के. कॉलेज रोडवरील श्री परती नागलिंगेश्वर मंदिर मैदानावर ही स्पर्धा उत्साहात पार पडली. मर्यादित 5 षटकांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव (एम.ई.एस.) संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


प्रथम फलंदाजी करताना इचलकरंजी क्रिकेट क्लब संघाने 5 षटकांत 4 बाद 47 धावा केल्या. प्रत्युत्तरात एम.ई.एस. बेळगाव संघाने 4.2 षटकांत 3 गडी गमावून 48 धावा पूर्ण करत 4 गडी राखून शानदार विजय मिळवला.

 belgaum


अंतिम सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कार रोहन गोमटे यांना, तर स्पर्धेतील ‘मालिकावीर’ पुरस्कार शाहू निळकंठाचे यांना मिळाला. तसेच प्रशांत उचगावकर (एम.ई.एस. बेळगाव) यांना ‘उत्कृष्ट फलंदाज’, तर अक्षय (इचलकरंजी क्रिकेट क्लब) यांना ‘उत्कृष्ट गोलंदाज’ म्हणून गौरवण्यात आले.


स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव संघाला आकर्षक करंडकासह 51,555 रुपये, तर उपविजेत्या इचलकरंजी क्रिकेट क्लब संघाला आकर्षक चषकासह 25,555 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.


यावेळी राजू कुंभार, सलमान पठाण, रवी माळी, विश्वनाथ कामगवडा, बंडू, राहुल पिसे यांच्यासह कुमार गजानन मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.