“मी आधी सीमाप्रश्नी पंधरा दिवसात तज्ञ समितीची बैठक घेतो नंतरच बेळगाव ला येतो” असे ठोस आश्वासन जयंत पाटील यांनी दिले आहे. शनिवारी दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मंत्री जयंत पाटलांची तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे ठोस आश्वासन या शिष्टमंडळाला दिलेलं आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी माजी आमदार मनोहर किणेकर खजिनदार प्रकाश मरगाळे आणि ए पी एम सीचे माजी सदस्य महेश जुवेकर यांचा समावेश असलेले समितीचे शिष्टमंडळ तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नुकतेच नियुक्त झालेले महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटले त्यावेळी त्यांनी उपरोक्त आश्वासन दिलआहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे समितीच्या शिष्टमंडळाने जयंत पाटील यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचीही भेट घेतली यावेळी शरद पवार यांनी मंत्री जयंत पाटील आणि कोल्हापूरचे मंत्री हसन मुश्रीफ यांना आदेश देत ‘तुम्ही सतत बेळगावच्या संपर्कात राहा, कायम बेळगावला ये-जा करत रहा असा स्पष्ट आदेश पवार यांनी समिती नेत्यां समोरच दिला त्यामुळे बेळगावच्या शिष्टमंडळाच्या भुवया आणखी उंचावल्या आहेत.
जयंत पाटील यांनी तज्ञ समितीची बैठकी नंतर आपण बेळगावला येऊ आणि ही बैठक झाल्यावर तात्काळ उच्चाधिकार समितीची बैठक घ्या अशी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं देखील या शिष्टमंडळा समोर सांगितलं.
मध्यवर्ती समितीच्या नेत्यांनी जयंत पाटील यांना आपण वारंवार बेळगावला येत राहावा किमान तीन महिन्यातून एकदा तरी एक बेळगाव दौरा करावा अशी विनंती यावेळी केली त्या विनंतीला मान देत जयंत पाटलांनी हे ठोस आश्वासन दिलेल आहे.