Wednesday, April 24, 2024

/

गुरुवंदना कार्यक्रमाला लाभणार संभाजीराजे यांची उपस्थिती

 belgaum

सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाला कोल्हापूरचे संभाजीराजे यांची उपस्थिती लाभणार आहे. १५ मे रोजी वडगाव, बेळगाव येथे आदर्श शाळेच्या मैदानात सकल मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी श्री श्री मंजुनाथ स्वामी यांचा गुरुवंदना कार्यक्रम होणार आहे. मराठा समाजाच्या एकत्रीकरणासाठी या गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ सोमवारी आदर्श शाळेच्या मैदानात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.SAmbhaji raje

कोल्हापूरचे छत्रपती ही महाराष्ट्राची महत्वपूर्ण गादी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत. शहाजीराजांनी बंगळुरूच्या गोसावी मठाची स्थापना केली होती.त्याच मठाच्या अधिपती म्हणून श्री श्री मंजुनाथ स्वामी यांचा पट्टभिषेक झाला आहे त्या नंतर बेळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रम होणार आहे.

 belgaum

या कार्यक्रमात कोल्हापूरच्या छत्रपतीं संभाजी महाराजांच्या हस्ते श्री श्री मंजुनाथ स्वामींचा सत्कार होणे हि औत्सुक्याची बाब आहे. अनेक वर्षांनंतर इतिहासाची हि पुनर्निमिती होत असून सकल मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून हि आनंदाची आणि समाधानाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.