Saturday, April 27, 2024

/

तेजा, भूमी करणार सुरक्षा व्यवस्थेला सहकार्य!

 belgaum

बेळगाव विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाने (केएसआयएसएफ) आपल्या सुरक्षा व्यवस्थेत दोन स्निफर डॉग्सचा अर्थात दोन श्वानांचा अंतर्भाव केला आहे.

सांबरा येथील बेळगाव विमानतळाची सुरक्षाव्यवस्था कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाकडून हाताळली जाते. या दलाकडून सुरक्षाव्यवस्थेत अत्यंत प्रशिक्षित अशा या स्निफर डॉग्स अर्थात श्वानांचा समावेश करण्यात आला असून त्यांची नावे ‘तेजा’ आणि ‘भूमी’ अशी असल्याचे बेळगाव विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.Airport

त्याचप्रमाणे ही दोन्ही श्वानं आरडीएक्स अंमली पदार्थ आदी घातक वस्तू शोधण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

बेळगाव विमानतळ हा कडून ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनुसार या विशेष श्वानांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार असल्या तरी या श्वानांचा दैनंदिन खर्च राज्य सरकार करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.