युवावर्ग हे देशाचे भविष्य असल्यामुळे युवा समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे युवा धोरण -2022 तयार करण्यात येत आहे. यासाठी जनतेच्या सूचना सल्ल्यांचा विचार करून येत्या 15 जूनपर्यंत नवे युवा धोरण लोकार्पण केले जाईल, अशी माहिती कर्नाटकाचे क्रीडामंत्री डाॅ. नारायणगौड़ा यांनी दिली
बेंगलोर विधानसभा येथे युवा सबलीकरणाची विशेष बैठक नुकतीच पार पडली. यावेळी क्रीडामंत्री डाॅ. नारायणगौड़ा बोलत होते. ते म्हणाले की, युवावर्ग हे देशाचे भविष्य आहे. यामुळे युवावर्गाच्या विकासासाठी युवा धोरण -2022 तयार करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो असून जनतेच्या सूचना सल्ल्यांचा विचार घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
बेंगलोर येथे झालेल्या विधानसभा बैठकीमध्ये कच्चा धोरणांचा मसुदा जारी करण्यात आला आहे. नवीन योजना राबविण्याकरिता वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले असून यासाठी जनतेचा निर्णय हा अंतिम असणार आहे. यासाठी जनतेला आपले मत मांडण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून जनतेच्या सूचना सल्ल्यांचा विचार करून 15 जूनपूर्वी नवीन मसुदा तयार करण्यात येईल, असे मंत्री डाॅ. नारायणगौडा यांनी सांगितले.
नव्या युवा धोरणासाठी डॉ. बालसुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली नवीन समिती नेमण्यात आली. या समितीतील सदस्य राज्यभरात संचार करून जनतेचे मत जाणून घेणार आहेत. त्यानंतर युवा धोरणाचा मसुदा तयार केला जाईल.
यासंदर्भात डॉ. बालसुब्रमण्यम यांनी युवा वर्गाच्या विकासासाठी प्रशिक्षण, उद्योग, आरोग्य, क्रीडा, युवा सबलीकरणाची पुनर्रचना त्याचबरोबर युवा अर्थसंकल्प मुद्द्यांचा समावेश करण्यात आला होता असे सांगितले. युवा समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे धोरण तयार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.