Tuesday, April 30, 2024

/

असहाय्य जखमी वासरावर ‘यांनी’ केलेले उपचार

 belgaum

बेळगाव शहरातील काकतीवेस रोड येथे रस्त्याकडेला जखमी अवस्थेत पडलेल्या एका असहाय्य वासराला रुग्णालयात नेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उपचार केले.

काकतीवेस रोड येथे आज बुधवारी सकाळी गाईचे एक वासरू जखमी अवस्थेत रस्ताकडेला पडलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश काळे आणि त्यांचे मित्र रोहन घोडके व विनायक अरकेरी यांच्या निदर्शनास आले.Treatment injured calf

त्यांनी त्या वासराला नजीक जाऊन तपासले असता त्याच्या पायाला जखमा झाल्याचे आणि त्यामुळे ते आजारी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेंव्हा गणेश काळे आणि त्यांच्या मित्रांनी त्या वासराला त्वरित पशु रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचाराची व्यवस्था केली.

 belgaum

डॉक्टरांनी उपचारांती लवकरच संबंधित वासरू तंदुरुस्त व निरोगी होईल असे सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश काळे आणि त्यांच्या मित्रांनी या पद्धतीने असहाय्य जखमी वासराला दिलासा दिल्याबद्दल पशुप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.