Tuesday, April 30, 2024

/

धोकादायक जुनाट वृक्ष काढा

 belgaum

बसवण कुडची बसवण गल्ली येथे एक जुनाट वृक्ष असून या वृक्षामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. येथील जुने चिंचेचे झाड पूर्णपणे वाळून गेले आहे. त्यामुळे त्याच्या फांद्या तुटून पडत आहेत.

येथील झाडामुळे अनेकांचे खूप मोठे नुकसान देखील झाले आहे .या झाडाच्या फांद्या गाड्यांवर पडत असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे या समस्येला कंटाळून गावातील भुपाल आप्पांना चौगुले  यांनी विभागाला निवेदन देऊन सदर झाड काढण्याची मागणी केली होती.

आता त्यांच्या या मागणीकडे कानाडोळा केल्याचे निदर्शनास आले आहे. झाडाच्या फांद्या अनेकांच्या घरावरTree पडून मोठे नुकसान होत आहे. तसेच रस्त्यावर या फांद्या पडत असल्याने रहादारीला देखील अडथळा निर्माण होत आहे.

 belgaum

त्याच बरोबर येथील गल्लीत लग्न जत्रा समारंभ यास अनेक शुभ कार्य केले जातात. तसेच या ठिकाणी अनेक शाळादेखील असल्याने विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे अनावाधनाने एखादा अनर्थ घडण्यापूर्वी येथील चिंचेचे झाड काढावे अशी मागणी  स्थानिकांनी नगरसेवक बसवराज मोदगेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे वनविभागाकडे केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.