सतीश फाउंडेशनच्यावतीने बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघातील विविध देवस्थान कमिटी व मशिदींना खुर्च्या आणि साऊंड सिस्टिम देणगीदाखल देण्याचा उपक्रम मंगळवारी उत्साहात राबविण्यात आला.
युवा नेते सतीश फाऊंडेशनचे राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते हा उपक्रम राबविण्यात आला. बेळगाव दक्षिण मतदार संघातील आंबेडकर भवन, फिश मार्केट, हजरत मिर्जावाले रहेतुल्ला अली मशिद, कलमेश्वर रोडवरील गणपती मंदिर, वाल्मिकी समुदाय भवन पिरनवाडी, श्री विठ्ठल -रखुमाई मंदिर मजगाव, श्रीकृष्ण मंदिर टिळकवाडी, अरेबिया मदरसा धामणे यांना खुर्च्या आणि साऊंड सिस्टिम देणगीदाखल वितरित करण्यात आले.
यावेळी बोलताना राहुल जारकीहोळी म्हणाले की यापूर्वी यमकनमर्डी मतदारसंघात आम्ही हा उपक्रम राबविला असून तेथील अनेक मंदिर आणि मशिदींना खुर्च्यावर साऊंड सिस्टिम वितरित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आता बेळगाव शहरातील उत्तर आणि दक्षिण भागात हा उपक्रम राबविला जात आहे असे सांगून सध्याच्या पेट्रोल आणि डीझेल दर वाढीवर त्यांनी टीका केली.
निवडणुकीवेळी फक्त भाषणे देणारे नेते आम्हाला नकोत. तळागाळातील लोकांमध्ये मिसळून विकास कामे करणाऱ्या नेत्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, असे मतेही राहुल जारकीहोळी यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना माजी जि. प. सदस्य सिद्धू सुणगार यांनी आमदार सतीश जारकीहोळी यांच्या कार्याची प्रशंसा करताना यमकनमर्डी मतदारसंघात कोणत्याही समस्या त्वरित निकालात काढले जातात.
त्यांच्या सारखे नेतृत्व आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे, असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी लाभार्थी तसेच माजी जि प सदस्य अरुण कटांबळे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्रदीप एम. जे., परशुराम, रघु लोकुर, किरण पाटील, फजल मकानदार, मलगोंडा पाटील आदींसह बेळगाव शहर काँग्रेसचे पदाधिकारी सदस्य आणि यमकनमर्डी मतदार संघातील ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.