Saturday, July 27, 2024

/

शाळेसमोर गांजा विक्री करणारे अटकेत

 belgaum

बेळगाव शहरातील एका नामवंत शाळेसमोर गांजा विक्री करणाऱ्या दोघा युवकांना अटक करून त्यांच्या जवळील गांजा आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

निखिल पाटील वय 27 राहणार भाग्यनगर बेळगाव आणि मोनीष पाटील वय 26 रा. अनगोळ बेळगाव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील एक किलो 100 ग्राम गांजा दोन मोपेड बाईक आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार सी सी बी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील आदी सहकाऱ्यांनी टिळकवाडी भाग्यनगर भागातील एका शाळे समोर गांजा विक्री करताना दोघांना रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळील गांजा जप्त केला आहे.

या आरोपीना विचारणा केली असता त्यांनी महाराष्ट्र राज्यातून गांजा आणून बेळगावात विक्री केल्याचे चौकशीत कबूल केले आहे सीई एन पोलिस स्थानकामध्ये प्रकरण दाखल झाले असून याबाबत अधिक तपास केला जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.