Saturday, April 27, 2024

/

शिवाजी नगरात चोरीचा प्रयत्न फसला

 belgaum

भर वस्तीतील आमोरा समोरील दोन्ही घरांचे कुलूप तोडून प्रवेश केला मात्र घरात काहीही न मिळाल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.शिवाजी नगर पहिली गल्ली येथे चोरट्यांनी घरात कोणी नसलेल्या पाहून प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला चोरीचा प्रयत्न केला.

मध्यरात्री तीन नंतर ही घटना घडली असून रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.शिवाजी नगर पहिली गल्ली तील अभय बेळगुंदकर आणि एका घरामध्ये चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला मात्र त्यांना कोणतीही मौल्यवान वस्तू हाती नाही लागल्याने हा चोरीचा प्रयत्न फसला.

शिवाजीनगर सारख्या भर वस्तीतल्या गल्लीच्या मधोमध असलेल्या घरांमध्ये चोरटे प्रवेश करत आहेत मात्र पोलिसांच्या याकडे दुर्लक्ष होत आहे एकीकडे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्यासाठी गरज आहे मात्र दुसरीकडे जनतेने पण सतर्क रहाण्याची गरज व्यक्त होत आहे.Theft attempt

 belgaum

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार अभय बेळगुंदकर यांच्या घराचं काम सुरू आहे म्हणून त्यांनी वरच्या मजल्यावर रात्री झोपायला गेले असता घरात कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला चोरीचा प्रयत्न केला.

मध्यरात्री दोन पर्यंत या भागातले लोक जागे असतात त्यामुळे मध्य रात्री तीन नंतर हा चोरीचा प्रयत्न झाल्याची शक्यता आहे.मार्केट पोलिसांनी अश्या घटनांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.