Friday, April 26, 2024

/

दातांवरील उपचारासाठी ‘येथे’ होतेय रुग्णांची लूट?

 belgaum

बेळगाव शहरातील बॉक्साइट रोड येथील एका खाजगी दंत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दातांवरील उपचाराच्या नांवाखाली रुग्णांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

बॉक्साइट रोडवर शहरातील एका प्रतिष्ठित संस्थेचे दंत महाविद्यालय आहे. सदर दंत महाविद्यालय सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी दातांच्या व्याधीवर उपचार केले जातात.

पूर्वी हे उपचार मोफत केले जात होते. मात्र अलीकडे या ठिकाणी दातावरील उपचारासाठी शुल्क आकारले जात आहे. याबाबत विचारणा केल्यास कोरोना प्रादुर्भावामुळे संस्था अडचणीत आल्याने रुग्णांकडून माफक शुल्क आकारण्यात येत असल्याचे सांगितले जाते.

 belgaum

मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून दंत महाविद्यालयातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

तरी दंत महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर गैरप्रकाराला तात्काळ आळा घालावा आणि रुग्णांची लूट थांबवावी, अशी जोरदार मागणी या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.