Friday, September 20, 2024

/

सोशल क्लब निवडणुकीसाठी ‘यांचे’ आवाहन

 belgaum

बेळगाव शहरातील जुन्या क्लब पैकी एक असलेल्या सोशल क्लबच्या कार्यकारिणीची निवडणूक उद्या रविवार दि. 27 मार्च 2022 रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मावळत्या कार्यकारिणीने आपण केलेल्या कार्याची आणि भावी योजनांची माहिती एका पत्रकाद्वारे दिली आहे.

सोशल क्लबच्या मावळत्या कार्यकारिणीने 2018 ते 2022 या आपल्या कार्य काळामध्ये क्लबचा चेहरा-मोहरा बदलला आहे. आम्ही सर्व सुविधांनी युक्त क्लब हाऊसची उभारणी केली आहे. या क्लब हाऊसमध्ये डीलक्स खोल्या, जिम आणि स्पा उपलब्ध आहे.

क्लबचे जुने प्रवेशद्वार बदलून त्याला नवे स्वरूप देण्यात आले आहे. आम्ही विविध कारणांसाठी वापरण्यायोग्य नवा कॉन्फरन्स हॉल बांधला आहे. क्लबच्या उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले असून क्लबमध्ये नवा बिलियर्ड्स टेबल बसविण्यात आला आहे.Social club

आम्ही क्लबच्या सदस्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण उपक्रम राबवला असून महेश फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचेसह पुरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देणगी दिली आहे. सोशल क्लबचा शताब्दी महोत्सव आम्ही 2018साली मोठ्या दिमाखात साजरा केला. त्यावेळी क्लबच्या ज्येष्ठ सदस्यांना सन्मानित करण्यात आले. आमच्या क्लब हाऊसचे उद्घाटन गेल्या 19 डिसेंबर 2021 रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते झाले.Bgm social club

भविष्यातील विकास योजना पुढील प्रमाणे आहेत. 1) राज्यातील प्रमुख क्लबशी संलग्नता, 2) बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरण, 3) क्लबला कर्नाटक सरकारकडून 50 लाखाचा निधी प्राप्त होणार आहे, 4) लवकरच नवे टेनिस कोर्ट देखील बांधण्यात येणार आहे, 5) क्लब मधील कार्ड रूम आणि सेंट्रल हॉलचे एसी बसवून नूतनीकरण होणार,

6) क्लबमध्ये लवकरच लेडीज क्लब विभाग सुरू केला जाणार असून कौटुंबिक स्नेहमेळावे सातत्याने भरविले जाणार. क्लबच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तेंव्हा क्लबच्या सदस्यांनी आमच्या कार्याची नोंद घ्यावी आणि आणखी विकास साधून सोशल क्लबला येत्या कांही वर्षात प्रगतीच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी आमच्या बाजूने कौल द्यावा, अशा आशयाचा तपशील सोशल क्लबच्या मावळत्या कार्यकारिणीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

सोशल क्लब कार्यकारिणीची निवडणूक 1 अध्यक्षपद, 2 उपाध्यक्षपदं आणि कार्यकारिणीची 8 सदस्य पदं अशा एकूण 11 जागांसाठी उद्या रविवारी होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.