belgaum

युक्रेन रशिया युद्धात युक्रेन मध्ये बळी पडलेल्या कर्नाटकातील राणीबेन्नूर तालुक्यातील नवीन ज्ञानगौडर या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सांत्वन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे. मंगळवारी त्या विद्यार्थ्याच्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त करताना बोम्मई यांनी नवीनचे वडील शेखर गौडा यांच्याशी फोनवरून बोलून कुटुंबाचे सांत्वन केले.

बोम्मई यांनी नवीनबद्दल अधिक माहिती घेतली आणि या दुःखाच्या वेळी आपण कुटुंबासोबत असल्याचे सांगितले. “हा एक मोठा धक्का आहे. रशियन सैन्याच्या गोळीबारात बळी पडलेल्या नवीनला चिरंतन शांती देवो. तुम्ही दुःखद घटना सहन करण्यासाठी धैर्यवान असले पाहिजे,” बोम्मई म्हणाले.

नवीनचे पार्थिव भारतात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांशी बोलणी सुरू आहेत, असे बोम्मई यांनी नवीनच्या वडिलांशी संवाद साधताना सांगितले.Ukrain navin

दुःखाने कंटाळलेल्या शेखर गौडा यांनी सांगितले की, मी सकाळीच मुलाशी फोनवर बोललो होतो आणि तो दररोज दोन-तीनदा फोन करत असे माझ्याशी बोलत असे अशी माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

केवळ कर्नाटकच नव्हे तर देशभरातून ‘नवीन’ ला अनेक ठिकाणाहून श्रद्धांजली वाहिली जात आहे राज्यासह राष्ट्रीय स्तरावरील अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर नवीन ज्ञानगौडर याला श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.