Monday, April 29, 2024

/

…देवा कसही करून जिल्ह्याचे विभाजन कर

 belgaum

आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार, मंत्री, मुख्यमंत्री आदींचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली जातात हे सर्वश्रुत आहे. तथापि बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होण्यासाठी चक्क देवाला साकडे घातले जात असल्याची घटना चिक्कोडी येथे घडली आहे.

देवा कांहीही करून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन कर बाबा, असे मागणे कांही आंदोलनकर्त्यांनी देवाकडे केले आहे. बेळगाव जिल्ह्याचे दोन भाग करून अथणी तालुक्याचे जिल्ह्यात रूपांतर केले जावे, अशी या आंदोलनकर्त्यांची इच्छा आहे.

महाबली हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनाद्री येथे आंदोलनकर्त्यांनी हा नवस केला आहे.

 belgaum

यासाठी हनुमान देवस्थानासमोरील नवसपूर्ती करणाऱ्या झाडाला केशरी वस्त्रात नवसाचा नारळ गुंडाळून बांधण्यात आला आहे. लवकरात लवकर अथणी जिल्ह्याची रचना व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.