Sunday, September 1, 2024

/

एकीकडे टंचाई; दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया

 belgaum

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहर परिसरात पाणीटंचाई निर्माण होण्याबरोबरच पाण्याचा अपव्यय होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या अलारवाड येथील पाण्याच्या टाकीतील हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

अलारवाड आणि कुडची परिसरातील पिण्याचे पाणी गेल्या चार दिवसापासून बंद आहे. अलारवाड येथील पंपसेट बंद असला तरी येथील पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचा प्रकार आज सकाळी निदर्शनास आला आहे.

Water leakage

शहर परिसरात सध्या पाण्याची टंचाई असताना या पद्धतीने हजारो लिटर वाया जाणाऱ्या पाण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

तसेच लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.