Sunday, September 1, 2024

/

चोरीला गेलेला देवाचा मुखवटा पंचांकडे सुपूर्द

 belgaum

गेल्या डिसेंबरच्या प्रारंभी पांगुळ गल्ली येथील श्री अश्वत्थामा मंदिरातील देवाच्या मूर्तीचा चोरीला गेलेला चांदीचा मुखवटा शुक्रवारी मार्केट पोलिसांनी मंदिर पंच कमिटीकडे सुपूर्द केला.

गेल्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चोरट्यांनी बेळगावातील मंदिरांना लक्ष केले होते.

शहरातील श्री महालक्ष्मी मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारल्यानंतर दोनच दिवसांनी सकाळच्या प्रहरी पांगुळ गल्ली येथील श्री अश्वत्थामा मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी देवाचा चांदीचा मुखवटा व इतर साहित्य लांबवले होते.Market ps

याप्रकरणी तात्काळ तपास चक्रे फिरवून पोलिसांनी चोरट्यांना गजाआड करण्याबरोबरच चोरीच्या वस्तू हस्तगत केल्या होत्या. त्यापैकी चोरीला गेलेला श्री अश्वत्थामा देवाचा चांदीचा मुखवटा परत मिळाल्यानंतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पोलिसांनी तो मुखवटा नुकताच श्री अश्वत्थामा मंदिर पंच कमिटीकडे सुपूर्द केला.

मार्केट पोलीस ठाण्याचे फौजदार विठ्ठल हावन्नवर यांच्या हस्ते श्री अश्वत्थामा मंदिर पंच कमिटीचे पंच मल्‍हारी कुऱ्हाडे, अरुण मुतगेकर, रायमन वाझ, सतीश अनगोळकर व राम मुचंडी यांनी देवाचा मुखवटा आपल्या ताब्यात घेतला. याप्रसंगी गल्लीतील प्रतिष्ठित नागरिकांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.