Saturday, April 27, 2024

/

‘त्या’ 36 जणांच्या जामिनावर 27 रोजी सुनावणी

 belgaum

गेल्या डिसेंबर महिन्यात बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आंदोलन करणाऱ्या 38 जणांपैकी रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 36 जणांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ती गुरुवार दि 27 जानेवारी रोजी होणार आहे.

बेंगलोर येथे गेल्या डिसेंबर महिन्यात घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आंदोलन करणाऱ्या 38 जणांवर मार्केट पोलिस ठाण्यांमध्ये इतर गुन्ह्यांसह राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटक करून कारागृहात डांबण्यात आलेल्या या सर्वांपैकी दोघा जणांना यापूर्वीच जामीन मिळाला होता. प्रखर हिंदुत्ववादी रमाकांत कोंडुसकर यांच्यासह उर्वरित 36 जणांच्या जामीन अर्जावर आज सोमवारी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठासमोर सुनावणी होणार होती.

 belgaum

तथापि ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून आज सर्व आरोपींची गुन्हा क्र. 88 व 91 मधील शुअरेटी प्रक्रिया पार पाडण्यात आली. आता गुरुवार दि. 27 जानेवारी रोजी या छत्तीस जणांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

जामीन अर्ज केलेल्या 36 जणांमध्ये रमाकांत कोंडुसकर, भारत मेणसे, बळवंत शिंदोळकर, नरेश निलजकर, मेघराज गुरव, विनायक ईश्वर सुतार, सुनील लोहार, रोहित माळगी, विनायक संजय सुतार, गजानन जाधव, विनायक उर्फ मायाप्पा कोकितकर, दयानंद बडसकर, सुरज गायकवाड, राहुल बारले, लोकनाथ उर्फ लोकेश रजपुत, महेश मुतगेकर, नागेश काशिलकर, राहुल सावंत, सिद्धू उर्फ श्रीधर गेंजी, गणेश येळ्ळूरकर, विकी उर्फ होल्लो मंडोळकर, सुरज शिंदोळकर, भालचंद्र बडसकर, विनायक हुलजी, राजा गुरव, हरीश मुतगेकर, बागेश नंद्याळकर, ऋतिक पाटील, अभिषेक पुजेरी, राजेंद्र बैलूर, श्रेयस उर्फ सोनू खटावकर व शशिकांत आरकेरी यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.