belgaum

कर्नाटकाला केंद्रीय आयोगाचा झटका

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील बेळगाव, बिदर आणि उत्तर कन्नड (कारवार) या सीमाभागातील विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या विशेष मतदार यादी फेरनिरीक्षण प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील गणना अर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी यासंदर्भात केंद्रीय आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती.

भारतीय निवडणूक आयोगाच्या २००८ च्या नियमांनुसार सीमाभागात निवडणूक प्रक्रियेचे सर्व अर्ज व साहित्य मराठीत देणे बंधनकारक असतानाही, प्रशासनाकडून केवळ कन्नड भाषेतील अर्ज दिले जात असल्याने मराठी मतदारांची मोठी अडचण होत होती.

 belgaum

या तक्रारीची गंभीर दखल घेत आयोगाने कर्नाटक प्रशासनाला हा प्रश्न तातडीने निकाली काढून केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय आयोगाच्या या भूमिकेमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या घटनात्मक हक्कांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.