Saturday, April 27, 2024

/

प्रवेश बंदीमुळे गेट वर गर्दी

 belgaum

कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच खबरदारीचा उपाय म्हणून पक्षकार व नागरिकांना येत्या 31 जानेवारीपर्यंत न्यायालयात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालय आवाराबाहेर सध्या पक्षकारांची गर्दी पहावयास मिळत आहे

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. न्यायालयाच्या ठिकाणी जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. आपल्या दाव्यांचे कामकाज, खटल्यांच्या तारखा आदींसाठी येणाऱ्या या लोकांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयात फक्त वकील मंडळींना त्यांच्या कामकाजासाठी प्रवेश दिला जात आहे.

वकीलासह तातडीच्या प्रकरणातील साक्षीदार, त्याचप्रमाणे कस्टडीत असलेले आरोपी वगळता पक्षकार वगैरे अन्य नागरिकांना न्यायालयात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आवारामधील नेहमीची गर्दी व धावपळ सध्या दिसेनाशी झाली आहे.

 belgaum

प्रवेश बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करताना बेळगाव न्यायालय आवाराची मुख्य प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात आली आहेत. प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस आणि नियुक्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडून तपासणी करूनच वकील वगळता इतरांना न्यायालय आवारात प्रवेश दिला जात आहे.

प्रवेश बंदीमुळे न्यायालयीन कामासाठी आलेले पक्षकारांना न्यायालय आवाराच्या भिंतीवरून आतील बाजूस असलेल्या आपल्या वकिलांशी काऊंटरवर थांबून बोलत असल्याप्रमाणे चर्चा करावी लागत आहे. बेळगावसह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या पक्षकारांच्या गर्दीमुळे न्यायालयासमोरील मुख्य दुतर्फा रस्ता दिवसभर गजबजलेला दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.