Saturday, December 7, 2024

/

लूटमार करणारे अटकेत-एपीएमसी पोलिसांची कारवाई

 belgaum

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीचा एपीएमसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अपहरण करून  लूटमार करणाऱ्या तीन जणांना बेळगाव मधून तर पाच जणांना गोव्या मधून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुबळी येथील रविकिरण नागेंद्र भट यांनी बेळगावच्या एपीएमसी पोलीस स्थानकात 18 जानेवारी रोजी अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवून पैसे आणि मौल्यवान वस्तू लुटल्याची फिर्याद दाखल केली होती मोठी रक्कम फिरोती मागण्यात आली असल्याच्या  फिर्यादीची दखल घेत एपीएमसी पोलिसांनी लूटमार करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे.

ए पी एम सी पोलिसांनी बद्रुद्दिना अयुब मुल्ला, वय 30, रा. न्यु गांधीनगर, नूर अहमद उर्फ ​​राजू महमूदसला कोल्लूर, वय ३०,रा. गांधीनगर रेहाना रियाज सय्यद, वय : ३५ रा रविवार पेठ खानापूर यांना बेळगाव तर कादिमीरा अझुल अझीम, खाजी वय 27, रा. रेलनगर बेळगाव,अरीफ इब्राहिम मुल्ला, वय : २७, रा आझाद नगर बेळगाव,

यूहिया झाकरिया केटगरी, वय: 23, रा.जांबोटी रोड पिरनवाडी, झुबेर रशीद पीरजादे, वय: 27 रा.देशपांडे गल्ली आणिनासीर नवाज खान यांचे पठाण, वय २३ यांना गोव्यातून अटक करत दरोडा करणे खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल केले आहेत.

एकूण या अपहरण आणि लूटमारीचा प्रकरणांमध्ये बेळगाव पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेण्यात घेण्यात येत आहे.ए पी एम सी पोलिसांनी ही कारवाई केल्या बद्दल त्यांचे डी सी पी रवींद्र गडादी यांनी अभिनंदन केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.