Friday, September 20, 2024

/

ओल्ड पी बी रोड रेणुकादेवी मंदिरात चोरी

 belgaum

बेळगाव शहरांमधली मंदिर पुन्हा एकदा चोरट्यांनी टार्गेट केली असून ओल्ड पी पी रोड समर्थ नगर क्रॉस येथील श्री रेणुका मंदिरावर चोरट्यांनी डल्ला मारतअडीच लाखांहुन अधिक किंमतीचे दागिने पळवले आहेत.यात देवीचा चांदीचे मुकुट किरीट सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे.

शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात चा कुलूप तोडून मंदिराच्या आत प्रवेश करत देवीचे दागिने चोरी केली .रविवारी पहाटे सकाळी मंदिराचे पुजारी पूजा करायला गेले असता हा प्रकार निदर्शनास आला.

त्यानंतर लागलीच पोलिसांना पाचारण करण्यात आले मार्केट पोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत श्वान पथकासह तपासणी केली. Theft renuka devi temple

गेल्या काही आठवड्यापूर्वीच बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागातील पांगुळ गल्लीतीक अश्वत्थामा मंदिरचा मुकुट चोरीला गेला होता त्यानंतर तो मार्केट पोलिसांनी चोरांना पकडून पुन्हा मंदिराच्या स्वाधीन केला होता मात्र आता मार्केटपोलीस स्थानक व्याप्तीतील समर्थ नगर कॉर्नर ओल्ड पी बी रोड ब्रिज खालील श्री रेणुका देवी मंदिरात चोरी झाली आहे.

मंदिरात चोरी झाल्याची माहिती कळताच तानाजी गल्ली समर्थ नगर परिसरातील भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती मार्केट पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी आणि पथकासह दाखल होऊन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांना रात्रीची गस्त आणखी कडक करावी लागणार आहे अशी मागणी वाढू लागली आहे.नवीन पोलीस आयुक्त आणि उपायुक्ताना चोऱ्या रोखणे देखील आव्हान असणार आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.