Friday, April 26, 2024

/

…अन् गृहनिर्माण मंत्र्यांनी साधला नागरिकांशी संवाद

 belgaum

राज्याचे गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमण्णा यांनी आज शनिवारी शहरातील रुक्मिणीनगर आणि तेथील झोपडपट्टी भागाला भेट देऊन स्थानिक रहिवाशांशी भविष्यातील विकास कामे आणि घरांच्या पुनर्बांधकामाबाबत संवाद साधला.

बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या विनंतीवरून राज्याचे गृहनिर्माण खात्याचे मंत्री व्ही. सोमण्णा यांनी आज शनिवारी रुक्मिणीनगर तसेच त्या भागातील झोपडपट्टीला भेट दिली.

सदर भेटीप्रसंगी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी रुक्मिणीनगर परिसर आणि तेथील झोपडपट्टी बाबत मंत्री महोदयांना माहिती देऊन लोकांच्या अडीअडचणी सांगितल्या.V somana

 belgaum

त्यावेळी गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमण्णा यांनी रुक्मिणीनगर तसेच झोपडपट्टीतील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच भविष्यातील विकास कामे आणि घरांच्या पुनर्रबांधकामाबाबत त्यांच्याशी संवाद साधला.

नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या नंतर रुक्मिणीनगर येथील घरांच्या पुनर्बांधणीचे काम लवकरात लवकर प्राधान्याने हाती घेतले जावे यासाठी आपण सर्व ते सहकार्य करू, असे आश्वासन मंत्र्यांनी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांना दिले. याप्रसंगी स्थानिक भाजप पदाधिकारी व नागरिकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.