Tuesday, April 23, 2024

/

कलम 144 ,तेवीस डिसेंबर पर्यंत?

 belgaum

सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत बेळगाव शहर आणि परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 144 कलमाची व्याप्ती आणखी वाढविण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

काही सरकारी सूत्रांकडून ही विश्वसनीय माहिती हाती आली असून 144 कलम 23 डिसेंबर पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशन घेण्याच्या पहिल्या दिवशी महामेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समितीने विरोधाची आपली प्रथा पाळली होती .त्यावेळी एका कन्नड संघटनेचे कार्यकर्त्याकडून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर महाराष्ट्र पेटला आणि महाराष्ट्राने कर्नाटकाच्या सीमेवर लाल-पिवळा जाळून आपला संताप व्यक्त केला.

 belgaum

या घटनेनंतर पुढे बेंगलोर मध्ये राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याला काळे फासण्याचा प्रकार घडला. त्या घटनेतून बेळगावातील मराठी भाषिक संतापले आणि ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे दगडफेक आणि पोलिसांच्या वाहनांक्या नुकसानी सारखे प्रकार घडले.

देशभक्त संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्याचा प्रकारही घडला असून तेव्हापासूनच 144 कलम लागू करण्यात आले आहे. मोर्चाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला काळे फासणार्यांचा निषेध करून कारवाई करण्याची मागणी केली जाणार होती. मात्र पोलिसांनी शनिवारी त्याला अटकाव करण्यासाठी 144 कलम लागू केला असून तो सोमवारपर्यंत वाढवला होता .

23 डिसेंबर पर्यंत अर्थात अधिवेशन संपेतोवर 144 कलम लागू राहण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याबद्दलची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून जमावबंदी अर्थात 144 कलम आणखी काही काळ लागू केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.