Saturday, April 20, 2024

/

अधिवेशनाच्या गोंधळात ओमिक्राँन चे भय

 belgaum

कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होत आहे. याच पार्श्वभूमीवर ओमिक्राँन या रोगाचे बळी वाढू लागले आहेत. अधिवेशनाच्या गोंधळात व ओमिक्राँनचे भय अशा पद्धतीची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. एकीकडे अधिवेशनामुळे कोट्यावधी रुपयांचा चुराडा होत आहे. आंदोलनामुळे नागरिक एकत्र येऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत ओमिक्राँन चे वातावरण घोंगावू लागले असून यावर सरकार कसा मार्ग काढणार हा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे.
खरे तर हिवाळी अधिवेशन बेंगलोर येथेच घ्यावे अशी मागणी विधानसभेत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाने लावून धरली होती. बेळगाव येथे अधिवेशन घेणे आमच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. या अनुषंगाने एक आंदोलनही झाले होते. मात्र तरीही कर्नाटक सरकारने बेळगाव येथे अधिवेशन घेणार हा अट्टाहास लावून धरला आणि त्यामुळे अधिवेशन होत आहे. मात्र याच काळात बेळगाव जिल्ह्यासह इतर सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ओमिक्राँन चे रुग्ण वाढू लागल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
या सार्‍या परिस्थितीवर कर्नाटक सरकार कसा मार्ग काढणार हा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापत असताना अधिवेशनातही वातावरण तापत आहे. मंत्रिमंडळ बैठक, विरोधी पक्षाची बैठक आणि इतर अनेक कारणांमुळे कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाज, खानापूर तालुका तसेच इतर अनेक संघटनांनी आंदोलनाची धार कायम लावून धरल्यामुळे अधिवेशन नेमके कोणत्या निर्णयाप्रत येणार हे समजू शकलेले नाही. अशा परिस्थितीत अधिवेशन झाले नसते तर बरे झाले असते असे म्हणण्याची वेळ उशिरा येऊ नये. याची काळजी घेण्याची गरज आहे.
कर्नाटक अधिवेशन चा पहिला टप्पा आता संपत आला असून दुसऱ्या टप्प्यातील तीन ते चार दिवस पुन्हा अधिवेशन होणार आहे. पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती यामुळे चांगलाच गदारोळ झाला होता. आता मुख्यमंत्री आले असले तरी अधिवेशनात नेमके काय घडते आहे, त्याचा सर्वसामान्य नागरिकांना काय फायदा आहे? यासारखे प्रश्न निर्माण झाले असून हे अधिवेशन रोग पसरून जाऊ नये एवढीच मागणी सध्या करावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.