Sunday, September 8, 2024

/

आरोग्य विभागाने दक्ष होण्याची गरज

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती सध्या चिंताजनक बनले आहे. 16 डिसेंबर रोजी हाती आलेली आकडेवारी बेळगाव जिल्ह्याचे आरोग्य संकटात घालणारी अशीच आहे .बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी 5 नवे रुग्ण आढळले तर 87 रुग्ण उपचार घेत आहेत. मृत्यू एकही नसला तरी ब्रे होण्याचे प्रमाण फक्त सहा इतकेच आहे. या दरम्यान ओमॅक्रोन सारख्या संकटांना तोंड देण्यासाठी बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याने आता दक्ष होण्याची गरज निर्माण झाली आहे.
2020 च्या मार्च महिन्यात आलेल्या पहिल्या आणि त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत अनेक बळी पडले आहेत . कोरोनाच्या संकटाला घाबरून आणि उपचाराविना अनेकांचा बळी गेला आहे. अशा परिस्थितीत खाट मिळत नाहीत, ऑक्सीजन सिलेंडर चा अभाव अशा अनेक समस्या आल्याने मागील लाटेत संकटाचा सामना करावा लागला.
ही वेळ पुन्हा येऊ नये यासाठी बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याने सक्षमपणे कार्य करण्याची गरज सध्या निर्माण झाले आहे. बेळगावचे बीम्स इस्पितळ वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. प्रादेशिक आयुक्त आदित्य आमलान विश्वास यांची नेमणूक झाल्यानंतर काही प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसला. मात्र सध्या किती ते किती सज्ज आणि किती उपचारांची सुसज्जता याचा प्रश्नही गंभीर बनला असून त्याची वेळोवेळी पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासंदर्भात कर्नाटक राज्याचे आरोग्यमंत्री या अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगावात आहेत. त्या डॉ के सुधाकर यांनी स्वतः बिम्स इस्पितळाला भेट देऊन कोरोनाला सामना करण्यासाठी ते किती सज्ज आहे याची पाहणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी अशी अटकळ डॉ सुधाकर यांच्याकडे घातले असून आपण स्वतः पाहणी करून त्याची परिस्थिती सुधारू असे आश्वासन त्यांनी दिले होते .मात्र प्रत्यक्षात काय झाले याचा अहवाल लवकरात लवकर जनतेला मिळण्याची गरज असून कोणीही घाबरून मृत्यू होऊ नये याची व्यवस्था करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.