belgaum

बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी दोन सुयांचा विणकाम करण्यासाठी वापर करून लोकरीची ५०१ वेगवेगळ्या प्रकारची रशियन पॅटर्नची लहान मुलांची स्वेटर्स तयार केल्याची दखल इनक्रेडीबल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे.विशेष म्हणजे केवळ स्वेटरच्या डिझाईनचे चित्र पाहून त्यांनी ही स्वेटर विणली आहेत.

पाच हजार वेगवेगळ्या प्रकारच्या लोकरीच्या वस्तू विणकाम करून तयार केल्याची दखल इनक्रेडीबल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे.अडीच हजार वेगवेगळी लोकरीची डिझाईन आणि तीनशे महिलांचे लोकरीचे टॉप तयार केल्याच्या विक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे.Asha patravali

bg

वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डस् ने ३५०० वेगवेगळ्या लोकरीच्या वस्तू विणकाम करून केल्याबद्दल प्रशस्तीपत्र दिले आहे. आशा पत्रावळी या गेल्या ४३ वर्षापासून विणकाम क्षेत्रात विविध प्रयोग करत आहेत.केवळ दहावी पर्यंत शिक्षण झालेल्या आशाताईंनी लिहिलेली विणकाम विषयावरील सहा पुस्तके प्रसिध्द झाली आहेत.

बेळगाव,कोल्हापूर,गोवा आणि अन्य ठिकाणी त्यांच्या लोकरीच्या वस्तूंचे प्रदर्शन भरले आहे.अनेक संस्थांचे पुरस्कार त्यांना लाभले आहेत.अनेक महिला,तरुणी यांना त्यांनी विणकामाचे प्रशिक्षण मोफत देवून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत केली आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.