Saturday, April 27, 2024

/

क्षुल्लक कारणावरून मित्राचा खून

 belgaum

बेळगाव शहरातील ओल्ड पी. बी. रोड वरील धारवाड नाकानजीक एका दारू दुकानांमध्ये रविवारी रात्री दारू पिण्यासाठी आलेल्या दोन मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान एका युवकाच्या खुनामध्ये झाल्याची घटना रविवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली.

सुरज नंदकुमार गौंडाडकर वय 23 कनकदासनगर जुने बेळगाव असे खून झालेल्या तरुणाचे नांव आहे मिळालेल्या माहितीनुसार जुने बेळगाव नाक्यावरील एका दारू दुकानांमध्ये रविवारी रात्री दोघा जणांमध्ये वादावादी होऊन हाणामारीत झाले. यावेळी झालेल्या धक्काबुक्की आणि ढकलाढकलीमध्ये खाली कोसळलेल्या सुरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने येळ्ळूर रोडवरील एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले. तथापि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी मयत सुरजचे वडील नंदकुमार भीमराव गौंडाडकर यांनी सुरजचा मित्र मंगेश राजेंद्र हसबे (रा. वडगाव) याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात खुनाची तक्रार नोंदविली आहे. जुन्या धारवाड रोडवरील महाराजा वाईन शाॅपसमोर रस्त्यावर झालेल्या भांडणात मंगेश याने आपला मुलगा सुरज याचा प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केला असल्याचे नंदकुमार गौडाडकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

 belgaum

खुनाच्या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री घटनास्थळी दाखल होऊन पाहणी व चौकशी केली.

तसेच सुरतचा खून करणाऱ्या त्याच्या मित्राचा शोध हाती घेण्यात आला आहे. शहापूर पोलीस ठाण्यामध्ये काल रविवारी रात्री उशिरा या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.