Thursday, May 2, 2024

/

युवा समितीच्या पाठपुराव्याला यश

 belgaum

खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने बस सेवेसंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून खानापूर ते नागरगाळी ही बससेवा मागणी केल्याप्रमाणे काल बुधवारपासून नेहमीच्या वेळेला सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थी-विद्यार्थिनीमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूर यांच्यावतीने खानापूर ते नागरगाळी बस सेवेसंदर्भात गेल्या 16 नोव्हेंबर 2021 रोजी खानापूर बस आगाराचे व्यवस्थापक आनंद शिरगुप्पीकर यांना निवेदन देण्यात आले होते. खानापूर ते नागरगाळी हि बस संध्याकाळी 5:30 या नेहमीच्या वेळेला सोडण्यात यावी, म्हणजे विद्यार्थ्यांचे वर्ग चुकणार नाहीत व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

याप्रसंगी खानापूर म. ए. युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील, राजू पाटील, मारुती गुरव, रणजीत पाटील, बाळकृष्ण पाटील, किशोर हेबाळकर, ज्ञानेश्वर सनदी, भूपाल पाटील, तालुका समितीचे गोपाळ पाटील, गोपाळ देसाई, रमेश धबाले, नारायण कपोलकर, मरू पाटील, शिवसेनेचे के. पी. पाटील, विद्यार्थी वर्ग,व कार्यकर्ते उपस्थित होते.Khanapur yuva samiti mes youth

 belgaum

विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आपली मागणी पूर्ण व्हावी यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून आगार व्यवस्थापक आनंद शिरगुप्पीकर यांनी काल बुधवारपासून नेहमीच्या वेळेला सायंकाळी 5:30 वाजता खानापूर ते नागरगाळी बस सुरू केली.

आपल्या निवेदनाची दखल घेऊन मागणी पूर्ण केल्याबद्दल यावेळी आगार व्यवस्थापक आनंद शिरगुप्पीकर यांचा युवा समितीतर्फे सत्कार करण्यात आला आणि आभार मानण्यात आले. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील, राजू पाटील, मारुती गुरव, बाळकृष्ण पाटील आदींसह विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.