Saturday, July 13, 2024

/

जुगार अड्ड्यावर पोलिसांचे छापे, 17 पकडले

 belgaum

बेळगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री कणबर्गी भागात दोन ठिकाणी छापे टाकून पत्ते जुगार खेळणाऱ्या १७ जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ९६,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ऑटो नगर येथे छापा टाकून पोलिसांनी 14 जणांना अटक करून 80,950 रुपयांची रोकड जप्त केली आणि कणबर्गी येथे 3 जणांना अटक करून 11,650 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. माळमारुती पोलिसांनी छापा टाकला होता.

बेळगाव शहर आणि परिसरात मटका व जुगार याचे प्रस्थ वाढत चालले आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी छापा टाकून यांनी कारवाईचे सत्र सुरू केले असून बेळगाव शहरात अनेकजण मटका जुगाराच्या नादी लागत आहेत. या प्रकरणी डीसीपी विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे मटका आणि जुगार अड्डे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हे प्रकार पूर्णपणे थांबवण्या च्यादृष्टीने पोलिस आणखी कारवाई गतिमान करणार हे निश्चित बनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.