Wednesday, April 24, 2024

/

बेळगावच्या शास्त्रज्ञाचे निधन

 belgaum

सुळगा -हिंडलगा बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. अरुण जायण्णावर यांचे आज पहाटे 2:30 वा. सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले.

निधन समयी त्यांचे वय 65 वर्षे होते त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. शहापूर स्मशान भूमी येथे आज सायंकाळी 5 वाजता डॉ. अरुण जायण्णावर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रासह सर्व थरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शास्त्रज्ञ डॉ. अरुण जायण्णावर हे इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स -इंडिया आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी या देशातील प्रमुख विज्ञान संस्थांचे नियुक्त सदस्य होते. भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद या देशातील सर्वोच्च संस्थेचा विज्ञान व तंत्रज्ञानासाठी असलेला शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने डॉ. जायण्णावर यांना सन्मानित करण्यात आले होते.Dr arun jayannavar

 belgaum

शारीरिक विज्ञानातील योगदानाबद्दल त्यांना हा देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कारांपैकी एक असणारा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. डॉ. अरुण जायण्णावर हे शहरातील गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेज अर्थात जी. एस. एस. कॉलेज आणि कर्नाटक विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते.

डॉ. अरुण जायण्णावर यांच्या निधनामुळे बेळगाव एका महान शास्त्रज्ञाला मुकला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.