Friday, March 29, 2024

/

राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेशा बाबत आवाहन

 belgaum

देशातील बेळगावसह छेल (हिमाचल प्रदेश), अजमेर (राजस्थान) बेंगलोर (कर्नाटक) आणि धौलपुर (राजस्थान) येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमधील आगामी 2022 -23 शैक्षणिक वर्षातील इयत्ता सहावी (विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी) आणि इयत्ता नववी (फक्त विद्यार्थ्यांसाठी) या वर्गांसाठी प्रवेश अर्जाचे आवाहन करण्यात आले असून ऑनलाइन प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 8 डिसेंबर 2021 ही आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न असणारे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ही पूर्णपणे निवासी शाळा असून ती केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे चालविली जाते. या शाळेतील आगामी 2022 -23 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता सहावी आणि नववी मधील प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले असून त्यासाठीचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत.

सहावी इयत्तेसाठी मुला -मुलीचे वय 31 मार्च 2022 रोजी 10 ते 12 वर्षे (1 एप्रिल 2010 ते 31 मार्च 2012 यादरम्यानचा जन्म असावा) असले पाहिजे. उमेदवार इयत्ता पाचवी उत्तीर्ण असला पाहिजे किंवा मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळण्यापूर्वी तो पाचवीत शिकून उत्तीर्ण झालेला असावा. इयत्ता नववीसाठी मुलाचे वय 31 मार्च 2022 रोजी 13 ते 15 वर्षे (1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2009 यादरम्यानचा जन्म असावा) असले पाहिजे. उमेदवार प्रवेशाच्या तारखेपूर्वी सरकारी अथवा मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता आठवी उत्तीर्ण झालेला असावा.Rms belgaum

 belgaum

ओएमआरवर आधारीत सामान्य प्रवेश परीक्षेबाबत (सीईटी) अर्ज केलेल्या मुला-मुलींना रजिस्टर ई-मेल आयडी, मोबाईलवरील ई-मेल /एसएमएसद्वारे सुचित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रवेश परीक्षेची माहिती शाळेच्या www.rashtriyamilitryschools.edu.in या वेबसाईटवर देखील उपलब्ध असणार आहे. याच वेबसाईटवर 8 नोव्हेंबर 2021 पासून ऑनलाइन प्रवेश अर्ज देखील उपलब्ध करण्यात आले असून शुल्कासह प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 8 डिसेंबर 2021 ही असणार आहे.

बेळगाव व बेंगलोर येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा पत्ता आणि टेलीफोन नंबर पुढील प्रमाणे आहेत. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेळगाव (कर्नाटक) -590009, दूरध्वनी 0831 -2406912. राष्ट्रीय मिलिट्री स्कूल बेंगलोर, पोस्ट बॉक्स 25040, म्युजयम रोड कर्नाटक -560025, दूरध्वनी 080 -25554972.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.