Monday, May 6, 2024

/

पुणे शहरात झळकले काळ्या दिनाचे फलक

 belgaum

महाराष्ट्र शासनाचे सर्वच मंत्री उद्या होणारा काळा दिन दंडाला फित बांधून सुतक दिन म्हणून पाळणार असताना पुणे शहरातील मुख्य चौकात बेळगावच्या काळ्या दिनाचे बॅनर झळकले आहेत.

गेली ६५ वर्षे सीमाभागातील लोक बेळगाव, निपाणी ,कारवार,बिदर,भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी लढत आहेत. सुरवातीच्या काळात महाराष्ट्रातील लोक यामध्ये सहभागी होते पण हळूहळू महाराष्ट्रातील लोकांचा यात सहभाग कमी झाला आणि महाराष्ट्रासाठी हि चळवळ फक्त राजकीय स्वरूपाची राहिली. पण हि चळवळ राजकीय नसून ती लोक चळवळ असल्याची जाणीव महाराष्ट्राला होणे गरजेचे आहे यासाठी जनजागृती म्हणून पुणे शहरात काळ्या दिनाचे 50 बॅनर झळकले आहेत.

बेळगावच्या पुढे महाराष्ट्रात सांगली , कोल्हापूर सोडल्यास फारसे या लढ्यात लोक सहभागी होत नाहीत पण यंदा पुन्हा एकदा या लढ्याचा आवेश महाराष्ट्रात जागृत करण्यासाठी पुण्यातील बेळगाव मित्र मंडळ ट्रस्ट यांनी पुढाकार घेतला आहे .Pune city flex

 belgaum

पुण्यातील प्रमुख अश्या कोथरूडच्या कर्वे चौकात, अभिनव चौक, विद्यापीठ चौक, सेनापती बापट रोड , जंगली महाराज रोड, डांगे चौक या सह पुण्यातील राजकीय पक्ष्यांच्या कार्यालयासमोर देखील संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत.

अश्याप्रकारे पुण्यात ५० ठिकाणी बॅनर असून यासाठी बेळगाव मित्र मंडळ ट्रस्ट च्या कार्यकर्त्यानी श्रम घेतले आहेत. १ नोव्हेंबर या दिवशी मराठी बहुल सीमाभाग हा मुंबई प्रांतातून काढून आताच्या कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आले. लाखो सीमावासीय मराठी जनतेवर अन्याय केला व अजूनही संयुक्त महाराष्ट्र अपूर्ण असून लवकर तो पूर्ण व्हावा यासाठी महाराष्ट्रातील लोकांमध्ये जागृती करण्यासाठी पुण्यातील बेळगावकरांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी बेळगाव मधून पियुष हावळ यांचे सहकार्य घेतले गेले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.