Wednesday, April 24, 2024

/

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ?

 belgaum

आगामी विधानसभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघात दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी अवस्था होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

हे दोघांचे भांडण कोणाचे आणि तिसऱ्याचा लाभ कोणाचा होणार? असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर आम्ही भाजप पक्षाबद्दल बोलतोय, विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी कुणाला या संदर्भात सध्या जोरदार चर्चा आणि मोर्चेबांधणी सुरू आहे .

दोन नेत्यांमध्ये भांडण सुरू असताना एक तिसरीच उमेदवार यात आघाडी घेणार असल्याचे दिसून येत आहे.
आता ही तिसरी उमेदवार कोण? या संदर्भातील आपली उत्सुकता ताणली असेल ,तर ती उमेदवार म्हणजे दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांची कन्या श्रद्धा अंगडी असल्याची चर्चा भाजप वर्तुळातच होत आहे.Shradha shettar

 belgaum

माजी आमदार संजय पाटील आणि भाजपचे कणखर नेते धनंजय जाधव यांच्यात सध्या तिकिटावरुन रस्सीखेच सुरू आहे .नुकतेच काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी यांनीही दोन आरएसएस नेत्यांच्या भांडणाचा उल्लेख भाजपचे विधानसभा तिकीट वाटपाचे भांडण दोन चड्डी मध्ये होत असल्याच्या विषयावरून विधान केले होते.

यातच संजय पाटील यांनी वाद ओढवून घेऊन आपली प्रतिमा मराठी भाषिक आणि कन्नड भाषिकात खराब करून घेतलेली आहे यामुळे आता तिकीट द्यायचे कुणाला असा प्रश्न पक्ष प्रमुखांकडे आला असून स्वच्छ आणि शिक्षित चेहरा म्हणून श्रद्धा अंगडी यांचे नाव पुढे करण्यात येत आहे.

श्रद्धा यांनी खासदारकिला उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र त्यांना शांत करून त्यांच्या आई म्हणजेच दिवंगत सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी देण्यात आली. तर आता विधानसभेतून त्यांच्या राजकारणाचा प्रवेश होणार असल्याचे दिसून येत असून सध्या तरी अंतर्गत भाजप वर्तुळात याची जोरात चर्चा होताना दिसत आहे.

Article courtasy- belgavi suddi kannada

1 COMMENT

  1. This is a very nonsense and unyielding game. A permanent stigma on our social behaviour and political platform. Every body thinks selfishly. Why not deserving , middle class and talent persons come forward to lead in democracy?A nation as whole we have piles of issues and problem ranging from unemployment to currption. Every party and every candidate should think of the nation first. Designations like MP or MLA ,CM orPM what ever it may be, should not be crowned for individual glorification but for the true service or people.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.