Wednesday, April 24, 2024

/

जीएसटी चुकविणारी 7 कोटींची सुपारी जप्त

 belgaum

जीएसटी चुकून नेण्यात येत असलेली 7 कोटी रुपयांची सुपारी केंद्रिय जीएसटी व अबकारी विभागाच्या बेळगाव कार्यालयाकडून जप्त करण्यात आली असून सुपारी वाहतूक करणारी सात वाहनेही वाहनचालकांसह ताब्यात घेण्यात आली आहेत.

केंद्रिय जीएसटी व अबकारी खाते बेळगावचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य हरि काटकर यांनी मंगळवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. जीएसटी न भरता सुपारीची वाहतूक सुरू असल्याची माहिती केंद्रीय जीएसटीचा मंगळूर विभागाने बेळगाव विभागाला दिली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

हुबळी नवलगुंद रोडवर पाळत ठेवून सुपारी घेऊन जाणारे ट्रक पकडण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे जीएसटी संदर्भातील कागदपत्रांची मागणी करण्यात आली. तथापि ट्रक चालकाकडे कागदपत्रे नसल्याचे उघडकीस आल्यामुळे ते सातही ट्रक व त्यातील सुमारे 7 कोटी रुपयांची सुपारी जप्त करण्यात आली. या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.Gst

 belgaum

सुपारीवर 5 टक्के जीएसटी आकारली जाते. कर्नाटकातील मनमाड म्हणजे अतिपाऊस पडणाऱ्या प्रदेशात व किनारपट्टी प्रदेशात सुपारीचे उत्पादन केले जाते. अनेकदा जीएसटी न भरता चोरट्या मार्गाने सुपारीची वाहतूक केली जात असल्यामुळे केंद्रीय जीएसटी विभागाचे मोठे आर्थिक नुकसान होत असते.

जप्त करण्यात आली सुपारी शिमोगा येथून खरेदी करून ती दिल्ली व आमदाबाद येथे पाठवण्यात येत होती. जीएसटी न भरताच सुपारीची खरेदी-विक्री तसेच वाहतूक करण्याची नियोजनबद्ध योजना यामागे असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे जीएसटी विभागाने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.